Top News

Breaking I जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ, उपनिरिक्षकासह २ पोलीस कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात

जास्तीत जास्त पैशांचे आमीष दाखवून ग्रामसेवकाला लाखो रुपयात गंडविले, जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जास्तीत जास्त पैशांचे अमिष दाखवून एक ग्रामसेवकाला गंडविण्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक उपनिरीक्षक, दोन पोलीस कर्मचारी आणि अन्य तीन संशयितांसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार विकास मच्छिंद्र पाटील (वय ३६, शांतीनगर, पाचोरा) हे खडकदेवळा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना जळगावच्या सचिन धुमाळ याच्याशी ओळख होती. ओळखीचा फायदा घेत सचिनने तक्रारदाराला पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवले. विश्वास ठेवून तक्रारदाराने १६ लाख रुपये देण्याचे ठरवले होते.

तक्रारदार जळगाव शहरात आल्यानंतर, एक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक आणि एक कर्मचारी यांच्यासोबत पैसे देण्यासाठी एक बॅग घेऊन शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये थांबले. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक आणि पथकाला माहिती मिळाली, आणि त्यांनी सापळा रचून ५ जणांना ताब्यात घेतले.

सर्व संशयितांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात आणखी संशयित असू शकतात, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या घटनेनंतर जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून, अधिक तपास सुरू आहे.

अधिक तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे शहर पोलीस ठाण्यात थांबून आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने