Top News

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालासमोर आंबेडकरी प्रेमी जनतेचे धरणे आंदोलन

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन, पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी !

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची विटंबना केली होती. या घटनेनंतर, सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या युवकाचा पोलिसांनी कोठडीत जबर मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालासमोर आंबेडकरी प्रेमी जनतेने धरणे आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, कोठडीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची, संबंधित पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि परभणी बंदच्या काळात निरपराध लोकांवर केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी विजय सुरवाडे, मुकुंद सपकाळे, मिलिंद गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने