कागदपत्रांची चोरी आणि मारहाण प्रकरणी अटकेतील ॲड. विजय पाटील यांच्याघरी तपासणी
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील कार्यालयातून कागदपत्रांची चोरी आणि मारहाण प्रकरणी अटकेत असलेले ॲड. विजय भास्कर पाटील यांच्याघरी मंगळवारी जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने झडती घेतली. या झडती दरम्यान पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तासह तपास केला.
कागदपत्रे चोरून नेण्याच्या आणि मारहाण प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ॲड. विजय पाटील यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. मंगळवारी त्यांच्या घराची तपासणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या तपासणीमध्ये संबंधित कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा