Top News

जळगावात धडक मोहीम राबवत २५० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई !


वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई; २५० हून अधिक रिक्षा जप्त, दंडात्मक कारवाईची घोषणा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आज जळगाव शहरात रिक्षा चालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी, १८ डिसेंबर रोजी सकाळी शहरातील वेगवेगळ्या भागात रिक्षा चालकांनी नियमांचे उल्लंघन केलेल्या रिक्षांवर धडक कारवाई केली.

रिक्षा चालकांकडून बिल्ला न ठेवणे, परमिट न असणे, विनापरवाना गॅस कीट वापरणे, पियूसी न असणे, इन्शुरन्स न घेणे आणि जादा प्रवासी भरून वाहतूक करणे अशा विविध त्रुटी आढळल्या. यामुळे २५० हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांनी याबाबत माहिती दिली की, "आता प्रत्येक रिक्षाची तपासणी केली जात आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल."

या कारवाईमुळे जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित होईल आणि नियम पाळण्याचे महत्त्व सर्व रिक्षा चालकांना लक्षात येईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने