शौर्य यात्रा कंपनी व नाथ फाऊंडेशनच्या वतीने सिदी कॉलनीतील शासकीय अपंग शाळेत उपक्रम, शाली व बॅकेलेट वाटप
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आज ३१ डिसेंबर मंगळवार रोजी स्व. निखिल एकनाथराव खडसे यांच्या जयंतीनिमित्त शौर्य यात्रा कंपनी आणि नाथ फाऊंडेशनच्या वतीने अपंग, फुटपाथवरील गरीब, अनाथ व्यक्तींना शालेय साहित्य आणि फराळ वाटप करण्यात आले. हे कार्यक्रम शासकीय अपंग बहुदेशीय शाळेतील सिदी कॉलनी, ठिकाणी दुपारी ४:०० वाजता पार पडले.
या वेळी शौर्य यात्रा कंपनीचे संचालक नामदेव वाघ आणि नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात अपंग आणि गरीब लोकांना थंडीपासून वाचवण्यासाठी शाली व बॅकेलेट वाटप करण्यात आले. यावेळी इब्राहिम तडवी सर, वाय एस महाजन सर, नगरसेवक सुनिल माळी, नगरसेवक राजुभाऊ मोरे, माजी नगरसेवक डॉ. रिजवान खाटीक, रहिमभाई तडवी, रमेशजी बारे, गणेश पाटील, सुशीलकुमार शिंदे, चेतन पवार, आकाश हिवाळे, हितेश जावळे, राजु बाविस्कर, योगेश लाडवंजारी, भिकन सानप आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हा उपक्रम स्व. निखिल खडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केला गेला होता, ज्यामध्ये समाजातील सर्वात दुर्बल घटकांसाठी एक महत्त्वपूर्ण मदतीचा हात दिला गेला.
टिप्पणी पोस्ट करा