रस्ता ओलांडताना गंभीर जखमी झालेले वानखेडे, उपचार सुरू असतानाचा सोमवारी निधन; दोन मुलांना हरवला पित्याचा आधार
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I खोटेनगर येथील दिलीप काशिनाथ वानखेडे (५४), जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी, हे रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते. २६ डिसेंबर रोजी दुपारी, शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना, त्यांनी महाराष्ट्र बँकेजवळ पराठे खाण्यासाठी थांबले होते. ते रस्ता ओलांडत असताना क्रीडा संकुलाकडून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर डोक्याच्या जखमा झाल्या आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना सोमवारी (३० डिसेंबर) दुपारी दिलीप वानखेडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या एक मुलगा आणि एक मुलगी या दोन जणांना पित्याचे छत्र हरवले आहे. यापूर्वीच त्यांच्या पत्नीचा निधन झालेले असल्याचे जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांनी सांगितले.
जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा