पाच मोटरसायकली चोरी त्याच्याकडून हस्तगत, एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I वेगवेगळ्या राज्यातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा चौफुली येथुन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीवरून परराज्यातील चोरट्यास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. दरम्यान त्याने विकलेल्या पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. दिपक प्रेमसिंग सोळंके (रा. वरठाण, ता. सोयगाव जि. संभाजीनगर) असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
अजिंठा चौफुली परिसरात एक इसम चोरीच्या मोटार सायकली विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पो.नि. संदीप पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलिस नाईक योगेश बारी, पो.कॉ. फिरोज तडवी आदींनी सापळा रचून दिपक सोळंके यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटार सायकलीसह ताब्यात घेण्यात आले. दिपक पाटील याच्या ताब्यातील मोटार सायकलीच्या चोरीबाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातून तीन, संभाजीनगर येथून एक आणि अडावद येथून एक अशा एकुण पाच मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. चोरीच्या मोटार सायकली त्याच्या कडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा