गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांना मिळाली मंत्रीपदाची मोठी जबाबदारी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी | राज्य सरकारचे मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर करण्यात आले असून, यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह आणि उर्जा खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर अजित पवार यांना अर्थ खात्याचे मंत्रालय मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांना नगरविकास खात्याची जबाबदारी दिली आहे.
याच प्रकारे, चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे, आणि चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय, जळगाव जिल्ह्यातील प्रतिनिधींसाठीही खाते वाटप करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या संदर्भात बोलायचे झाले, तर ना. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, ना. गिरीश महाजन यांना जलसंपदा खात्याचे (विदर्भ, तापी आणि कोकण) तसेच आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्रीपद देण्यात आले आहे. तर, ना. संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालयाचे कार्यभार सोपविण्यात आले आहे.
यामुळे राज्य सरकारच्या कार्यसंघात महत्त्वपूर्ण बदल झाल्याने आगामी काळात विविध विभागांमध्ये विकास व सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा