Top News

जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात लाच स्वीकारताना अडकला अधिकारी

छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने ३ लाखांची लाच घेत असलेल्या अधिकाऱ्यासह कर्मचारीवर केली कारवाई

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने छापेमारी करून महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह एक कर्मचारी ३ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले आहेत.

संपूर्ण तपशीलानुसार, जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात दीपक पाटील हे काही महिन्यांपूर्वी मुख्य अधिकारी म्हणून पदावर रुजू झाले आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या बदलीनंतर संबंधित पद महिनोंपासून रिक्त होते. गुरुवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका अधिकाऱ्याच्या लाच घेत असताना सापळा लावून त्यांना रंगेहाथ पकडले.

सुरुवातीला एका अधिकाऱ्याच्या दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणी करण्यात आली होती. पथकाने तपासणी केली आणि खात्री झाल्यानंतर कारवाई केली. सध्या संबंधित दोघांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात आणले असून अधिक तपास सुरु आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने