जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव भाजपा महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ चाळीसगाव भारतीय जनता पार्टी च्या वतीने जल्लोष करण्यात आला
आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव भारतीय जनता पार्टी च्या वतीने जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी फटाके फोडून तसेच मिठाई भरवत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रा. सुनील निकम, संयोजक राजेंद्र वडिलाल राठोड, सरचिटणीस योगेश खंडेलवाल, दिनकर राठोड, विसापूरचे सरपंच विजय राठोड, ममराज, रघुनाथ कोळी, समाधान पगारे, आप्पा गवळी, सागर गवळी, जाने साहेब, विशाल पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वसामान्य जनतेसाठी शपथविधी सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी आ.मंगेशदादा चव्हाण यांच्यावतीने मोठ्या स्क्रीनवर लावण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा