डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यामुळे महाविकास आघाडीचे जळगावात आंदोलन, पुतळ्याला अभिवादन करून निषेध
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्याने महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शहा यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यात बाबासाहेबांविषयी केलेल्या अपमानजनक टिप्पण्यामुळे देशभरातील लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज (२० डिसेंबर) जळगाव शहरात शिवसेना कार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढली. या वेळी कार्यकर्त्यांनी पुतळ्याला अभिवादन करून अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
निषेध आंदोलनात शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण, सरचिटणीस दीपक सोनवणे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, यु.वा.स. कार्यकर्ते यश सपकाळे, उप महानगर प्रमुख गिरीश कोल्हे आणि अन्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीने या मुद्द्यावर कडक कारवाईची मागणी केली असून, शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
टिप्पणी पोस्ट करा