महिला जागीच ठार, तर एक जण जखमी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी । पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी असलेले दाम्पत्य जळगाव शहरातील शिवाजी नगर पूल येथून दुचाकीवरून जात असतांना अचानक ट्रक ने त्यांना धडक दिली. या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी आहे की, अशोक सुकदेव गोराडे (वय-६०) हे पत्नी वंदना अशोक गोरडे (वय-५५) रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा येथील रहिवासी होते. हे दुचाकीवरून जात असतांना शालकाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी चांदसर कामतवाडी गावी जात होते. दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीजे.४७९६ ने जात असताना छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर सकाळी १०.१५ च्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच.२१.एबी.७४६६ ने दुचाकीला धडक दिली. अपघातात वंदना गोराडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अशोक गोराडे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पच्छात मुलगा व २ मुली असा परिवार होता. या घटनेची माहिती मिळताच टॉवर चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली, याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध शहर पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा