Top News

अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध पोलिसांची मोठी मोठी कारवाई; ६४ ट्रॅक्टर, १७ डंपर, ४ जेसीबी जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध पोलिस दलाने एकाच रात्रीतून मोठी कारवाई केली. यात ६४ ट्रॅक्टर, १७ डंपर, ४ जेसीबी जप्त करण्यात आले आहेत. तसेच, ४५ दुचाकी, ३ रिक्षा आणि ४ चारचाकी वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. याबरोबरच १३ जणांना अटक केली असून, या कारवाईत ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस आणि महसूल प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी २७ डिसेंबर रोजी कारवाईच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या, त्यानुसार जिल्हाभरात रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवण्यात आली.

कालिंका माता चौकामध्ये बुधवारी वाळूच्या डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे एक नऊ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आणि मयताच्या बहीण व मामा गंभीर जखमी झाले. यामुळे संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला आणि ठिय्या आंदोलन केले. या घटनेनंतर वाळू वाहतुकीविरोधात नागरिकांचा रोष वाढला आहे.

पोलिस विभागाने नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि फिक्स पॉइंट्स लावून वाळू तस्करांवर लक्ष ठेवण्याचा कडक निर्णय घेतला आहे. जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त केली गेली आहेत.

जिल्ह्यातील काही ठिकाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

रामानंद नगर: ३ दुचाकी, ३ डंपर, १ मशीन

जळगाव तालुका: २ डंपर, ३ ट्रॅक्टर

रावेर: २ ट्रॅक्टर, ४ दुचाकी

यावल: ६ ट्रॅक्टर

चाळीसगाव: १ ट्रॅक्टर, ४ दुचाकी

भडगाव: ५ ट्रॅक्टर, ३ दुचाकी


याबरोबरच वाळू माफियांच्या साहित्याची देखील जप्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी वाळू चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित पोलिसांनी, "अवैध वाळू वाहतूक व वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सतत सुरु राहणार आहे," असे सांगितले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने