शेख अकबर यांना रस्त्यात अडवून दोन लाखाची खंडणी मागणाऱ्या अजिज मुलतानीला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शहरातील अक्सा नगर परिसरात शेख अकबर शेख अब्बास (वय ३३, रा. अक्सा नगर) यांना दुचाकीवर मुलांना इकरा कॉलेजला नेहताना चाकूचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपीचे नाव अजिज बाबा मुलतानी (रा. गेंदालाल मील, जळगाव) असून त्याने शुक्रवारी शेख अकबर यांना रस्त्यात अडवून धमकावले होते.
फिर्यादीत म्हटले आहे की, अजिज मुलतानीने काही कारणाशिवाय शेख अकबर यांना चाकू दाखवून खंडणीची मागणी केली. त्यावर शेख अकबर यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली आणि एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अजिज मुलतानीला अटक करून न्यायालयात हजर केले, जिथे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा