जागेची पाहणी पूर्ण, भव्य मंडप उभारणीची तयारी सुरू; महंतांचे नियोजनाची पाहणी जळगावात
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I झुरखेडा गावठाण, पाळधी जवळ, जळगाव शहराच्या कडेला २५ ते ३० डिसेंबर दरम्यान बागेश्वर धामचे प्रसिद्ध संत बाबाजी धीरेंद्र शास्त्री यांच्या भव्य कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जागेची पाहणी १ डिसेंबर रोजी शहरातील प्रमुख मान्यवरांनी केली.
कथेसाठी असलेल्या विस्तृत स्थळावर लवकरच भव्य मंडप उभारला जाणार असून, २५ डिसेंबरपासून दररोज दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत धीरेंद्र शास्त्रींच्या कथेचे निरूपण केले जाईल. कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी करताना कार्यकर्त्यांनी जागेचे सपाटीकरण कसे करावे, याबाबत चर्चा केली आणि आवश्यक सूचना दिल्या.
बागेश्वर धामचे महंत आज जळगावात पोहोचणार असून, ते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि तयारीची पाहणी करणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा