यावल पोलिसांनी संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले, २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I किनगाव-यावल रस्त्यावर १६ नोव्हेंबर रोजी दुचाकी सवारांना अडवून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल लांबवणाऱ्या दोन चोरट्यांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत दोन संशयित आरोपींना शनिवारी यावल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
घटनेच्या तपशिलानुसार, भालशिव-पिंप्री (ता. यावल) येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे आणि शिवलाल भगवान सपकाळे हे १६ नोव्हेंबरच्या रात्री चोपडाहून यावलकडे जात होते. यावेळी किनगावजवळ दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवून, हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल लांबवला.
त्यानंतर यावल पोलिसांचे पथक, पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि परमेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे फरहान शेख (२४), रा. मिर्झानगर, बुलढाणा आणि शेख राजिक शेख इसरार (२२), रा. डांगपुरा, यावल या दोघांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
टिप्पणी पोस्ट करा