जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी तालुका विधी सेवा समिति व अधिवक्ता संघ, मुक्ताईनगर आणि राष्ट्रीय सेवा योजना एकक, कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगरचे दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्र. श्रेणी, श्री. बी. जी. पवार, तसेच ॲड. श्री. ए. आर. कांडेलकर, वकील, मुक्ताईनगर यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड. श्री. डी. एस. काळे, ॲड. श्री. आर. एस. हागे, ॲड. श्री. व्ही. एस. इंगळे आणि ॲड. श्री. एस. एम. तायडे यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या प्रारंभात डॉ. बी. डी. रोमाडे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर सर्व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशीकेचे वाचन केले. श्री. बी. जी. पवार यांनी संविधानातील विविध कलमांवर मार्गदर्शन करतांना नागरिकांना संविधानाच्या महत्वाचे अधिकार व कर्तव्ये सांगितली. त्याचबरोबर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचे उदाहरण देत संविधानातील कलमांचा अभ्यास करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संदीप पाटील यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांचा पालन करण्याची महत्त्वाची भूमिका सांगितली. ॲड. श्री. ए. आर. कांडेलकर यांनी संविधानातील मुलभूत अधिकारांची माहिती देत, भारतातील संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नामदेव धूर्वे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. कुशल ढाके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुशल ढाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सागर बंड यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. प्रशांत नागे, डॉ. बी. डी. रोमाडे, डॉ. कुशल ढाके, डॉ. तुषार भोसले, डॉ. सागर बंड, डॉ. रवींद्र जाधव आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा