जिल्हा पेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी । ३५ वर्षीय शिक्षकाने आजाराला कंटाळून कुणालाही दोषी ठरवू नका अशी सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात आकाशवाणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत झालेले व्यक्तीचे नाव राहूल आंबादास पाटील वय ३५ रा. बोरखेडा ता.धरणगाव ह.मु.गुजराल पेट्रोलपंप, जळगाव असे मयत आहे.
सविस्तर बातमी अशी आहे की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवाशी राहूल आंबादास पाटील हे आपल्या पत्नी व आई यांच्यासोबत जळगावातील गुजराल पेट्रोलपंपाजवळ वास्तव्याला होता. ते शहरातील खासगी क्लासेस येथे शिक्षक म्हणून नोकरीला होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पोटाचा गंभीर आजार होता. त्यामुळे त्यांच्या पोटाची दोनवेळा शास्त्रक्रिया देखील झालेली आहे. दरम्यान, पोटाच्या आजारालाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण गळफास घेत असून यात कुणालाही दोषी ठरवू नये असे सुसाईड नोट लिहून त्यांनी गुरूवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली. बाहेर गेलेली पत्नी घरात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. पतीला पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा