एकाला अटक तर दुसरा फरार, जिल्ह्यातील पोलीस विभागात खळबळ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पारोळ्यात कारवाई
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I १५ हजाराची लाच स्वीकारतांना दोन पोलिसांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने अटक करण्यात आली आहे तर यांच्यात एकाला अटक केली आहे. तर दुसरा हा फरार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या खाकीला डाग लागल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर बातमी अशी आहे की, काही दिवसांपूर्वी पारोळा ते धरणगाव रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सदर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्या वाहनचालकाला अटक न करण्यासाठी या पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील या दोन कर्मचाऱ्यांनी ३० हजार रूपयांची लाच मागितली होती. यात तडजोड होऊन १५ हजार रूपयांची लाच देण्याचे निश्चीत झाले.
दरम्यान, या व्यक्तीने संबंधीत प्रकरणात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. येथे या प्रकरणाची खातरजमा करून एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने बुधवारी १५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना एका पोलीसाला रंगेहात अटक केली असून दुसरा मात्र फरार झाला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात हिरालाल देविदास पाटील ( वय ४३ वर्ष पारोळा पो.स्टे.रा. हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर); प्रवीण विश्वास पाटील, (वय ४५ वर्ष, रा. पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे धुळे येथील निरिक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा