Top News

विना हुंडा विवाह संबंध जुळवण्याचे कार्य अविरत करत राहणार - सुमित पाटील

जळगाव खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून शिवधर्म विवाह पद्धतीनुसार विवाह संपन्न

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव खान्देश मराठा वधुवर ग्रुपच्या माध्यमातून "विना हुंडा विवाह संबंध" जुळवण्याचे कार्य संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली अविरत सुरू आहे. नुकताच विना हुंडा विवाह जुळवून चि. रोहन केशवराव पाटील (रा. नावरा, ता. धुळे) आणि चि.का. सौ. अंकिता ईश्वरचंद्र पाटील (रा. मालखेडा, ता. चोपडा, जि. जळगाव) यांचा विवाह २४ नोव्हेंबर २०२४ रोजी जळगाव येथील कृष्णा लॉन्स येथे शिवधर्म विवाह संस्कार पद्धतीनुसार पार पडला.

विवाहसोहळ्यात सुमित पाटील यांची विशेष उपस्थिती होती. दोन्ही परिवारांनी बिनाहुंडा साखरपुडा करण्याचा संकल्प केला होता, जो मराठा- कुणबी समाजातील आदर्श परंपरेचा श्रीगणेशा ठरला. सुमित पाटील यांनी यावेळी ही परंपरा आपल्या ग्रुपचा नवीन पायंडा ठरवून समाजात आदर्श निर्माण होईल, असे सांगितले.

विना हुंडा विवाह ही आजच्या काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या पद्धतीचे अनुकरण समाजातील सर्व स्तरांतील कुटुंबांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या विवाहसोहळ्याच्या आयोजनात उपाध्यक्ष किशोर पाटील, भैय्यासाहेब निलेश पाटील आणि सर्व ग्रुप एडमिन यांचे सहकार्य लाभले.

सुमित पाटील यांनी भविष्यात अशा अनेक आदर्श विवाहसोहळ्यांचे आयोजन व्हावे यासाठी आपल्या ग्रुपवर अधिकाधिक बायोडेटे पाठवण्याचे आवाहनही केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने