Top News

आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची श्रीराम मंदिरात पूजा करून सुरुवात, रॅलीला जुन्या जळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांकडून औक्षण, पुष्पवृष्टी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून आशीर्वाद; पहिल्याच दिवशी रॅलीने घेतली आघाडी

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात जुन्या जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिरात पूजा करून करण्यात आली. मंगळवारी, ५ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या चरणी लीन होऊन आ. भोळे यांनी विजयाचा संकल्प केला.

यानंतर जुन्या जळगावातील विविध कॉलनीत आ. भोळे यांची प्रचार रॅली काढण्यात आली, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या, तर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. रॅलीत विविध घोषणांनी परिसर दुमदुमला – "कहो दिल से, राजूमामा फिर से", "राजूमामा आमदार होणारच!" या घोषणांनी कार्यकर्त्यांचा उत्साह उंचावला.

रॅलीदरम्यान खा. स्मिता वाघ, माजी महापौर सीमाताई भोळे यांचाही औक्षणाने सन्मान करण्यात आला. गोपाळपुरा येथील भोलेनाथ मंदिरात पूजन करून आ. भोळे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. पहिल्याच दिवशी जनतेच्या उत्साहामुळे प्रचारात आघाडी घेतल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती.

या प्रचार रॅलीत भाजपचे लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने