Top News

कुलभूषण पाटील यांच्या प्रचार रॅलीला भवानी माता मंदिर, पिप्राळा येथून सुरुवात!"

"सेंट्रल बँक कॉलनी, आनंद मंगल, वीर सावरकर नगरसह विविध परिसरांतून रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद"

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I आज पिप्राळा येथील भवानी माता मंदिरात नारळ फोडून कुलभूषण पाटील यांच्या प्रचार मोहिमेची सुरुवात करण्यात आली. 

यानंतर पिप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनी, आनंद मंगल, वीर सावरकर नगर, आसावा नगर, निसर्ग कॉलनी, इंद्रजित सोसायटी, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, आनंद बन सोसायटी यांसह विविध भागातून प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या प्रचार रॅलीला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. या प्रचार रॅलीच्या माध्यमातून पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला तसेच आपल्या आगामी योजना व उद्दिष्टांची माहिती दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने