Top News

प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन महायुती उमेदवार सुरेश भोळे आज प्रचाराचा श्रीगणेशा करणार

जळगाव शहरात नारळ फोडून प्रचारास सुरुवात; महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) उद्या आपल्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. आज सकाळी 7.30 वाजता जुने जळगाव येथील प्रभू श्रीराम मंदिर येथे श्रीरामाचे दर्शन घेऊन नारळ फोडून त्यांनी प्रचाराला प्रारंभ करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रचार मोहिमेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रचाराची सुरुवात राम मंदिर, जुने जळगाव येथून होईल व संपूर्ण जळगाव शहरातील प्रमुख भागांतून प्रचार फेरी काढण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी 3.00 वाजता मंडल क्र. 4,6 प्रभाग क्र. 7,11 येथून पुढील प्रचारास सुरुवात होईल. गट नं. 53, गट नं. 54, शिव कॉलनी, आशा बाबा नगर परिसर, पंडितराव कॉलनी, रेल्वे लाईन परिसर, हरिविठ्ठल नगर अशा विविध परिसरातून प्रचार मोहिम राबवली जाईल. समारोप श्रीधर नगर येथे होईल.

या प्रचार मोहिमेचे नेतृत्व महायुतीचे जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर करणार असून, मोठ्या उत्साहात जळगाव शहरातील नागरिकांना महायुतीच्या विचारधारेशी जोडण्याचे प्रयत्न केले जातील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने