Top News

३६ वर्षीय युवकाचा घराच्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

मेहरुन तलाव परिसरातील गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटमध्ये घडली दुर्घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील मेहरूण तलावजवळील गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. ३६ वर्षीय अश्विन दीपक चौरसिया हे आपल्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चौरसिया हे रात्री ९ वाजता आपल्या नवी पेठ येथून वडिलांच्या घरून पार्सल घेऊन आले होते. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ते कसे पडले याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. चौरसिया हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने