जळगाव जिल्हा पोलीस प्रमुख, अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित, शहीदांचा त्याग; कर्तव्याला सलाम
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस आणि जवानांना पोलीस मुख्यालय जळगाव येथे आज श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
यावेळी जळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा