*दिव्यांगांनी सजविल्या पणत्या, मान्यवरांनी केले कौतुक*
जळगावअपडेट न्युज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी सजवलेल्या विविधरंगी पणत्या प्रज्वलित करून हा उपक्रम चिमुकले श्रीराम मंदिरात पार पडत असतो. यंदा देखील चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, ह.भ.प. दादा महाराज जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
उपक्रमासाठी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, प्रवीण चौधरी, हेतल पाटील, जयश्री पटेल, हेमांगी तळेले, महेंद्र पाटील, मेहुल रोटे, प्रतिभा पाटील, रितेश पाटील, वेदांत महाजन,सोहम सरोदे यांनी यांनी परीश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा