जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी : खान्देश रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेतर्फे हमाल बांधवांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने मिठाईवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर यांच्या पुढाकाराने यावर्षी सुमारे 550 हमाल बांधवांना मिठाई, तसेच 90 महिला हमाल भगिनींना मिठाई आणि साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला जळगाव शहराचे माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, इंजि. राहुल सोनवणे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते. आपल्या मनोगतात राहुल सोनवणे यांनी आबा बाविस्कर यांची हमाल बांधवांसाठीची कटिबद्धता आणि त्यांच्या समस्या सोडविण्याच्या कार्यप्रवृत्तीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाल सुरवाडे, दीपक माने, लहू हटकर, संतोष हटकर, इम्रान शेख, सुरेश बाविस्कर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा