Top News

शिवसेना उपनेते संजय सावंत जळगावचे प्रचारप्रमुख - जयश्री महाजन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख म्हणून शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख संजय सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सावंत आगामी पंधरा दिवस शहरात मुक्काम करून प्रचाराचे नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयाचे काम पाहणार आहेत.

"आम्ही जळगावची जागा हमखास जिंकणार आहोत. माननीय उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी शहरात एकजूटीनं काम करत आहे. या निवडणुकीत परिवर्तनाची संधी जनतेला मिळणार आहे," अशी आशा सावंत यांनी व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने