Top News

वृद्धाश्रमातील भावांना 'नारीशक्ती'ची अनोखी भाऊबीज भेट

मातोश्री आनंदाश्रम येथे वृद्धांसोबत भाऊबीज साजरी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I दिवाळीचा उत्सव सगळीकडे साजरा होत असताना, वृद्धाश्रमातील एकाकी भावांना सांत्वन देण्यासाठी आणि त्यांना प्रेमाची अनुभूती देण्यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने एक विशेष उपक्रम हाती घेतला. या संस्थेने मातोश्री आनंदाश्रम येथे वृद्धांसोबत भाऊबीज साजरी केली, त्यांना मिठाई आणि टॉवेल भेट देत त्यांच्या जीवनात आनंदाचा क्षण निर्माण केला.

वृद्धांच्या आयुष्यात एकाकीपणा कमी करण्याच्या उद्देशाने नारीशक्तीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली, प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया आणि सहप्रमुख प्रवीण देशमुख यांच्यासह किरण तोडकरी, मंजुषा अडावदकर, आशा मौर्य, हर्षा गुजराती, श्रावणी पाटील, आणि सुमेरसिंग पाटील यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

या उपक्रमामुळे परिसरात सर्वत्र कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने