जळगाव : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच "आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा" असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरत आहेत.
आज, 3 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ललितकुमार रामकिशोर घोगले यांनी समता नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिव मंदिर परिसरात मोठा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात स्थानिक तरुणांनी 'ललित भाऊच होणार आमदार' असा निर्धार करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला वंचित आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल सुरवाडे, तसेच सनी अडकमोल, गोकुळ सोनवणे, अतुल पवार, मछिंद्र कर्डीले, सागर केदार आणि असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
टिप्पणी पोस्ट करा