जळगाव शहरातील विविध भागांतून प्रचाराचा शुभारंभ; मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाजन यांचे जोरदार प्रयत्न
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. विविध भागांमध्ये जाऊन महाजन यांनी मतदारांशी संवाद साधत आपले प्रचाराचे कामकाज सुरू केले आहे. यावेळी कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून जयश्री महाजन यांना पाठिंबा दिला.
महाजन यांनी आपल्या प्रचारात महाविकास आघाडीच्या विकासाच्या योजना व धोरणे यावर भर दिला. तसेच, जळगाव शहराच्या प्रगतीसाठी आपल्या पक्षाचे योगदान व भविष्यातील योजना मतदारांसमोर मांडल्या. त्यांनी जळगावकरांच्या गरजांसाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.
महाजन यांच्या प्रचार मोहिमेत कार्यकर्त्यांचा उत्साह व नागरिकांचा प्रतिसाद पाहता निवडणुकीत चांगली लढत होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा