तपस्वी हनुमान मंदिर, शाहूनगर येथे नारळ वाढवून शुभारंभ; मनसे नेते ऍड. जयप्रकाश बाविस्कर राहणार उपस्थित
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उद्या, दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी, सकाळी 9 वाजता शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिर येथे करण्यात येणार आहे. प्रचाराचा नारळ वाढवून उद्घाटन करण्यात येणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ऍड. जयप्रकाश बाविस्कर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
डॉ. अनुज पाटील यांच्या नेतृत्वात ही प्रचार रॅली प्रभाग क्रमांक सहा मधील शाहू नगर, जेडीसीसी बँक कॉलनी, पोलीस ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट, पोलीस मुख्यालय गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या ठिकाणी फेरी मारणार आहे.
दुपारच्या सत्रात, तीन ते सात या वेळेत प्रचार रॅली गोलाणी मार्केट आणि फुले मार्केट येथे पोहोचणार आहे. मनसेच्या जळगाव शहरांतील सर्व पदाधिकारी, आजी-माजी मनसैनिक आणि संकटाचे पदाधिकारी यांना या रॅलीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी डॉ. अनुज पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालया जवळ सकाळी 8:30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा