Top News

भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंटच्या टँकरची जबर धडक, दोन जण ठार

चालकाचा ताबा सुटल्याने थेट आसरीच्या दुकानात घुसले टँकर, एरंडोलजवळ घडली घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
जिल्ह्यातील एरंडोल - जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सीमेंटच्या टँकरने महामार्गा लगत असलेल्या आसारिच्या दुकानास जबर धडक दिली.  या दुर्घटनेत टँकर चालक फुलचंद (वय २६, रा. चिलूला ता.  हैदरगड जि.  बाराबंकी) हा जागीच ठार झाला.  तर पादचारी शकील नबी  बागवान (वय ३४,  रा. एरंडोल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अमळनेर नाक्यानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील गती रोधकाजवळ चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भल्या पहाटे २ वाजेचे सुमारास सदर अपघात घडला.  दरम्यान अमळनेर नाका परिसरात महामार्गावरील पथदिवे बंद असल्याकारणाने या ठिकाणी या आधी देखील अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहे.  या शिवाय गतिरोधकाबाबत फलक लावलेला नाही अशा तक्रारी पुढे येत आहे.

एम. एच. १५ जे सी १९९५  या क्रमांकाचा सिमेंटचा टँकर भरधाव वेगाने राष्ट्रीय महामार्गाने जात असताना गतिरोधकावर चालकाचा ताबा सुटल्याने थेट आसरीच्या दुकानात घुसल्याने चालक हा जागीच ठार झाला.   शकील नबी बागवान हे एरंडोल येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे संचालक होते. ते त्यांच्या भावाच्या लग्नासाठी कपड्यांसह इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी आई सोबत मालेगाव येथे गेले होते. तेथून ते व त्यांची आई लक्झरी बसने रात्री उशिरा एरंडोलला पोहचले घरी परत जाताना रस्त्याच्या बाजूने पाई चालत असताना टँकरच्या मागील चाकात आला.  त्यामुळे त्याचे दोघ पाय निकामी झाले.

दरम्यान  जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले. तर त्याची आई सुदैवाने बालबाल बचावली. घटनास्थळी सकाळी मोठा जनसमुदाय जमला असता त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या उदासींतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने