Top News

जानेवारीत रंगणार २३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव

 
बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ३, ४ व ५ जानेवारी २०२५ रोजी जळगावात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I  भारतीय अभिजात संगीताचे संरक्षण आणि प्रसार करणारा प्रतिष्ठित 'बालगंधर्व संगीत महोत्सव' ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात आयोजित करण्यात येणार आहे. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत होईल.

यावर्षीच्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव जनता सहकारी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सुहान्स केमिकल्स प्रा. लि., जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रा. लि., चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि., तसेच संस्कृती मंत्रालय, भारत सरकार हे प्रतिष्ठानास सहाय्यक आहेत.

महोत्सवाची सुरुवात ३ जानेवारी रोजी बेंगलोर येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायिके भगिनी रेश्मा भट आणि रमैया भट यांच्या गायनाने होईल. दुसऱ्या सत्रात, कोलकाता येथील अनिरबन रॉय आणि मैत्रेयी रॉय यांची बासरी आणि गायन जुगलबंदी रसिकांना मंत्रमुग्ध करेल.

दुसऱ्या दिवशी, बेंगलोरचे उमदा गायक अनिरुध्द ऐटल आणि दिल्लीच्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना शिंजीनी कुलकर्णी यांचे सादरीकरण महोत्सवाला रंगत आणतील. तिसऱ्या दिवशी, कोलकत्याची 'तबला क्वीन' रींपा शिव एकल तबला वादन सादर करणार आहेत.

महोत्सवाच्या समारोपात, नंदिनी शंकर (व्हायोलिन) आणि महेश राघवन (जिओ श्रेड) यांच्या जुगलबंदीसोबत प्रख्यात तबला वादक तनय रेगे यांची साथ असणार आहे.

या महोत्सवाची यावर्षीची सुसंवादिनी असतील अभिनेत्री आणि गायिका जुई भागवत. महोत्सवात रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी प्रतिष्ठानची विनंती आहे.

प्रवेशिकेसाठी, कृपया दीपिका चांदोरकर (मो. ९८२३०७७२७७) यांच्याशी संपर्क साधावा.

संपर्क: स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान
"कौमुदी" गट नं ४८१/१७, एकता अपार्टमेंट, पार्वती नगर, जळगाव

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने