Top News

जळगाव महापालिकेची मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कडक कारवाई

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर महापालिका प्रशासन 'ॲक्शन मोड' वर

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा कडक धडक मोहीम सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक तीन मध्ये १७ जणांचे नळ कनेक्शन ताबडतोब बंद करण्यात आले, ज्यामुळे एकाच दिवशी आठ लाख रुपयांची वसुली केली गेली आहे.

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर महापालिका प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये आले असून, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाला वसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपायुक्त धनश्री शिंदे आणि प्रभाग समिती क्रमांक तीनचे प्रभाग अधिकारी सुमित जाधव यांनी एक विशेष मोहिम सुरू केली आहे.

या मोहिमेत १७ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले असून, आता या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू होईल. महापालिकेने प्रभाग समिती २ आणि ४ मध्येही मालमत्ता करांच्या वसुलीची प्रक्रिया सुरु केली आहे. काही थकबाकीदारांनी तीन दिवसांची मुदत मागितल्याने त्यांना या मागणीला मान्यता देण्यात आली आहे. तथापि, २ डिसेंबरनंतर भरणा न केल्यास त्यांचे नळ कनेक्शन पुन्हा बंद करण्यात येईल, असा इशारा सहायक आयुक्त गणेश चाटे यांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने