डॉ. अनुज पाटील यांनी शाहूनगर येथे मंदिरात पूजा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचार मोहिमेला शुभारंभ केला; कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांनी नारळ वाढवून आणि हनुमानाची पूजा करून आपल्या प्रचाराची सुरुवात केली.
स्थानिक कार्यकर्ते, समर्थक, आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. डॉ. पाटील यांनी लोकांशी संवाद साधत आपल्या संकल्पना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धोरणांवर चर्चा केली. प्रचारामध्ये विविध प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन देत त्यांनी मतदारांना पक्षाच्या विकासात्मक दृष्टीकोनावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
टिप्पणी पोस्ट करा