Top News

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते महाआरती

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद पुनः मिळावे यासाठी भाजपच्यावतीने प्रार्थना

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभावे, यासाठी भाजप जिल्हा महानगरतर्फे श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर, गोलाणी मार्केट येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

कार्यक्रमात भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, तसेच जिल्हा पदाधिकारी मंडळ, अध्यक्ष नगरसेवक, महिला अध्यक्ष, युवा मोर्चा व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम दरम्यान प्रभू श्रीराम, श्री हनुमान यांच्या जयघोषाने वातावरण एकदम भक्तिमय बनले. कार्यकर्त्यांच्यावतीने ही महाआरती केली गेली, ज्यामध्ये सर्वांनी एकसाथ प्रार्थना केली की, महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व मिळावे, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह, दिसून येत होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने