Top News

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

भोरगाव लेवा पाटीदार पंचायत व जळगाव विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

भोरगाव, ता. जळगाव, निखिल वाणी I सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे जळगाव विभाग व सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात माल्यार्पण, रांगोळी स्पर्धा, बक्षीस वितरण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ललित रमेश पाटील आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तही आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते श्री. निंबाजी कृष्णा चौधरी, डॉ. मुरलीधर कौतिक भंगाळे, श्री. भानुदास धर्मा भोळे, श्री. हरी पांडुरंग पाटील, श्री. दत्तात्रय तुकाराम चौधरी व इतर निवृत्त अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक माधुरी हितेश बारी यांनी, द्वितीय क्रमांक विद्या विशाल टेकावडे यांनी, तृतीय क्रमांक ईश्वरी उदय सोनवणे यांनी मिळवला. विद्या टेकावडे या कर्णबधिर विद्यार्थिनीने सुई-दोऱ्याच्या माध्यमातून अखंड भारत कसा जोडला गेला, याची सुंदर रांगोळी काढली होती. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

डॉ. ए. जी. भंगाळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणाने संस्कृतीवर कसा परिणाम होतो, यावर विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात डॉ. उल्हास पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्याची स्तुती केली. सत्कारार्थी श्री. दत्तात्रय तुकाराम चौधरी यांनी आपल्या मनोगतात नवीन पिढीला सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत वारके यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. स्नेहल फेगडे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने