मुंबईत १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मुंबई अपडेट न्यूज, निखिल वाणी I मुंबईत १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाण्यात गुंगीचं औषध मिसळून त्या मुलीला प्यायला दिलं. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. अब्दुल मोतिन खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमकी काय घडली घटना?
पीडित तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवण्यात आलं. लिफ्ट दिल्यानंतर तिला तरुणांनी घरी सोडतो असं सांगितलं. त्यानंतर तिला प्यायला पाणी दिलं. या पाण्यात गुंगीचं औषध मिसळलं होतं. पीडित तरुणीला ते पाणी देण्यात आलं. पाणी प्यायल्यामुळे तिला गुंगी आली. ज्यानंतर दोन तरुणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
टिप्पणी पोस्ट करा