Top News

गावठी कट्ट्याने फायर करणारा मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घातल्या बेड्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाची कारवाई

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अखेर जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कटटयाने फायर करणारा मुख्य आरोपी ताब्यात घेतला आहे. आरोपी निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे (कोळी), वय ३२, रा. वाकटुकी, ता. धरणगाव, हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. 

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे, पिंप्री खुर्द येथे आठवडे बाजारात आरोपी फिरत असल्याचे कळताच पथकाने सापळा रचला व आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गावठी कटटा, मॅगझीनसह २५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर आरोपीला पुढील तपासासाठी धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने