Top News

नवरात्र अष्टमीच्या निमित्ताने निराधार महिलांसाठी साडी-चोळी ओटी समारंभ: नारीशक्तीच्या जागराचा उपक्रम

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा स्त्री शक्तीचा जागर, 25 निराधार महिलांचा साडी-चोळीने ओटी भरली, जुन्या समजुतींना फाटा देत मातृशक्तीचा सन्मान

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आज, ९ ऑक्टोबर बुधवार, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे नवरात्र अष्टमीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा सन्मान करणारा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात २५ निराधार महिलांना साडी-चोळी, हळदी-कुंकू आणि खण-नारळ देऊन ओटी भरली गेली. या उपक्रमाद्वारे जुन्या रूढींना फाटा देत गंगा भागीरथी व परित्यक्ता महिलांच्या माध्यमातून स्त्री शक्ती आणि मातृशक्तीचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाचे नेतृत्व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ. मनीषा पाटील यांनी केले. त्यांच्या सोबत एडवोकेट सीमा जाधव, नूतनतास खेडकर, श्रीमती ज्योती राणे, किमया पाटील, वंदना मंडावरे, मंजुषा अडावदकर, हर्ष गुजराती, भारती कापडणे, विद्या जकातदार यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने