मनसेने नवख्या उमेदवाराला दिलेल्या संधीवर कार्यकर्त्यांचा आक्षेप; पक्षात नाराजीचे वातावरण
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मनसेच्या जळगाव शाखेत सध्या नवख्या उमेदवाराच्या निवडीवरून प्रचंड खळबळ उडाली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी या उमेदवाराविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.
मनसेने आगामी निवडणुकीसाठी नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. मात्र, कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, या उमेदवाराची अनुभव कमी असून पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार करण्यास तो सक्षम नाही. अशी चर्चा जळगाव शहरात रंगू लागली आहे.
मनसेमध्ये या अगोदर हे उमेदवार कुठल्याही ठिकाणी उपोषण किंवा निवेदन, कार्यक्रम असताना दिसून न येत असल्याची देखील चर्चा सध्या जळगाव शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
जळगावातील या घटनाक्रमामुळे मनसेमध्ये नव्याने अंतर्गत वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
टिप्पणी पोस्ट करा