दुचाकी चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक; जळगाव व भुसावळ येथून चोरी झालेल्या दुचाकींचे गुन्हे उघड
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरात दुचाकी चोरणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. जळगाव शहरातील अक्सानगर येथे राहणाऱ्या अशपाक सत्तार पटेल याच्याकडे चोरीची रॉयल इन्फिल्ड बुलेट मोटारसायकल असल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी शोधमोहीम राबवली. त्याच्या घरासमोर लावलेली चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. चौकशीत त्याच्या जावयाने चार वर्षांपूर्वी भुसावळ येथून ही मोटारसायकल चोरी करून आणल्याचे समोर आले.
तपासादरम्यान, भुसावळ येथील तन्वीर मजीद पटेल हा शाईन मोटारसायकलसह आढळून आला. त्याच्या चौकशीत, साथीदार आवेश बिसमिल्ला शेख याने या दुचाकींची चोरी केल्याचे उघड झाले. या प्रकरणात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये चोरीची नोंद झाली होती. पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा