मनसेच्या दुसऱ्या यादीत जळगावातुन नव्या चेहऱ्याला उमेदवारी; स्थानिक राजकीय वातावरणात उत्सुकता
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) त्यांच्या दुसऱ्या उमेदवारांच्या यादीत जळगावातून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मनसेने या यादीत काही महत्त्वाच्या बदलांसह नवीन उमेदवारांची घोषणा केली असून, जळगावमधील राजकीय समीकरणांमध्ये त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.
नव्या उमेदवाराच्या घोषणेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या नव्या उमेदवारासोबत प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. नव्या उमेदवाराने आपल्या पहिल्या मुलाखतीत सांगितले की, “जळगावातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी मनसेच्या धोरणांनुसार काम करणार आहे आणि जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.”
मनसेने जळगावात यापूर्वीही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आता या नव्या उमेदवाराच्या निवडीने स्थानिक राजकारणात कसे बदल घडतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा