Top News

भारताचे ज्येष्ठ उद्योगपती व पद्मविभूषण सन्मानित रतन टाटा यांचे निधन

रतन टाटा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

मुंबई अपडेट न्यूज, निखिल वाणी I भारताचे ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मविभूषण सन्मानित रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज, गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी, एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दुखवटा पाळला जाईल. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारचे मनोरंजन किंवा करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कार शासकीय इतमामाने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने