Top News

जळगावात सिंधी समाजाच्या व्यक्तींच्या मोबाईलवर बदनामीकारक मजकूर

हॉटेल मालकांनी एमआयडीसी पोलिसांत दिली तक्रार; चौकशी सुरु

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहरात सिंधी समाजाच्या व्हाट्सअप ग्रुप वर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेच्या संदर्भात सिंधी समाजात मोठ्या प्रमाणे खळबळ उडाली आहे.

 शहरातील सिंधी समाजाच्या नागरीकांच्या मोबाईलवर एक अज्ञात इसमाने दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी बदनामीकारक मजकूर पाठवला असून हा मजकूर एमआयडीसी परिसरात असलेल्या हॉटेल फॉर सीजन व हॉटेल मालक महेश पूरनमल प्यारप्यानी यांच्या बदनामीसाठी तयार करण्यात आला होता. हॉटेलच्या बाबतीत खोटे व लबाडीचे आरोप करणारा हा मजकूर सिंधी समाजाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करण्यात आला, तसेच पत्रके जळगाव शहरातील सिंधी समाजाच्या दुकानांमध्ये वाटली गेली.

हॉटेल मालक महेश प्यारप्यानी यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर पत्रके वाचून त्यात त्यांची व त्यांच्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्वरित एमआयडीसी पोलीस स्थानकात जाऊन अज्ञाताविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

सदर घटनेने जळगावच्या सिंधी समाजामध्ये खळबळ माजली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने