उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी नवीन वाहतूक सुविधा
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी श्रीकृष्णा पाटील (क्रिष्णा पेक्टीन्स प्रा. लि.) यांनी दिलेली शाळेची व्हॅन दिनांक 20 ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात आली. उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या सोहळ्याचे अध्यक्ष श्रीकृष्णा पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कवरलालजी संघवी उपस्थित होते.
कार्यक्रमास सुप्रीम कंपनीचे सुरेश मंत्री, रवीजी कोंबळे, महाडिक, सुगंध मुनोत, डॉ. गौरव महाजन, व रोशन रुणवलं यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी एक लहानसा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीकृष्णा पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
उडानच्या संचालिका हर्षाली चौधरी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, या व्हॅनचा उपयोग तज्ञ मंडळींसह गावोगावी जाऊन तेथील दिव्यांग मुलांना सेवा प्रदान करण्यासाठी केला जाणार आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठी सोय होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती ढाके यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री पटेल, ज्योती रोटे, हेतल वाणी, प्रतिभा पाटील, विनोद शिरसाळे व रामचंद्र पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा