युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांची भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून सलग तिसऱ्यांदा निवड, रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी काम करण्याची संधी
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज अशोक कावडीया यांची भारतीय रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी सलग तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. मागील चार वर्षांच्या दोन कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे कावडीया यांना पुन्हा एकदा या समितीत स्थान मिळाले आहे. यंदाची निवड दोन वर्षांसाठी असून समितीचा कार्यकाळ ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत राहणार आहे.
मध्य रेल्वे क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांचा समावेश असून मुंबई सेंट्रल, सोलापूर, भुसावळ, पुणे, नागपूर या मंडळांमध्ये जवळपास ५०० रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. कावडीया हे या समितीतील सर्वात कमी वयाचे युवा सदस्य असल्याचे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विराज कावडीया यांनी सांगितले की, "रेल्वे प्रवाश्यांच्या हिताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य न्याय मिळवून देणे आणि रेल्वे बोर्ड आणि प्रवाश्यांमधील समन्वय साधणे हे माझे मुख्य ध्येय आहे." यासाठी त्यांना शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, शिवसेना तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, नितीन लड्ढा, विष्णू भंगाळे, आणि शरद तायडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा