Top News

Breaking : काँग्रेसची पाहिली यादी जाहीर, रावेरमधून धनंजय चौधरी विधानसभेच्या रिंगणात


रावेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून धनंजय चौधरींना तिकीट; पक्षाच्या पहिल्या यादीतून निवडणुकीची तयारी जोरात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, रावेर मतदारसंघातून धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रावेरमध्ये काँग्रेससाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात असून, स्थानिक राजकारणात मोठ्या उलथापालथींची शक्यता वर्तवली जात आहे.

धनंजय चौधरी हे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसने रावेरमध्ये स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार मोहिमेत धनंजय चौधरी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसने निवडणुकीत भाजपसमोर मजबूत आव्हान उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

रावेर मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. या निवडीमुळे काँग्रेसच्या स्थानिक गटांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धनंजय चौधरी यांनी उमेदवारी मिळाल्याबद्दल पक्षाचे आभार मानले असून, रावेरच्या जनतेची सेवा करण्याचे वचन दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने