ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; मुस्लिम बांधवांचे विधानसभेसाठी पाठींबा
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पाळधी येथे आज हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिरसोली, ममुराबाद, भोने, अहिरे, बिलवाडी, लमांजन, गारखेडा, चावळखेडा, सुभाषवाडी, कुऱ्हाळदा, भागपूर आणि लोणवाडी येथील नागरिकांनी मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला.
विविध विकासकामांमुळे प्रभावित झालेल्या या नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर पाळधी येथील मुस्लिम पंच कमिटीने देखील विधानसभेत संपूर्ण सहकार्याचे वचन दिले. या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये मा. सभापती कैलास चौधरी, मुकुंदराव ननवरे, संजय पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, दीपक भदाणे, जी. प. सदस्य गोपाळ बापू पाटील, महानगर प्रमुख संतोष पाटील, ओबीसी अध्यक्ष राजेंद्र पाटील, तसेच इतर महायुतीचे पदाधिकारी होते.
टिप्पणी पोस्ट करा